Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

केंद्रीय कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी. यंदाची दिवाळी ही केंद्रीय कर्मचा-यांसाठी (Central Government Staff) खास असून दिवाळीआधीच त्यांना दिवाळीचे गोड गिफ्ट मिळणार आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात वाढ होणार असून लवकरच म्हणजे दिवाळीआधीच सरकार याबाबत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनुसार, एनडीए सरकार कर्मचा-यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची शक्यता असून लवकरच याबाबत सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या 2.57 फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पुर्ण झाल्यास त्यांच्या पगारात 8,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार ही भेट केवळ 'अ श्रेणी ' आणि 'ब श्रेणी' कर्मचाऱ्यांसाठीच आहे. अशीही चर्चा आहे की, या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) 26 महिन्यांची थकबाकी  (Months Arrears) थकबाकीही सोबत मिळणार आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 7व्या वेतन आयोग शिफारशींनुसार 'अ श्रेणी' आणि 'ब श्रेणी' (नॉन मिनिस्ट्रियल कर्मचारी) हेल्थकेयर प्रोफेशनल्ससाठी पेशेंट हेल्थकेयर अलाउंससाठी मंजूरी देण्यात आली आहे. हेही वाचा- 7th Pay Commission: दिवळीआधीच दिवाळी, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार! मिळणार बक्कळ बोनस, महागाई भत्ता, 26 महिन्यांची थकबाकी

प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत 18 सप्टेंबर 2019 एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की, 7व्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकार विविध हेल्थकेयर केंद्रांमध्ये काम करणाऱ्या श्रेणी ए आणि श्रेणी बी हेल्थकेअर प्रोफेशनल्सला पेशेंट केअर अलाऊन्स देण्यात येईल.

केंद्रीय सरकारी कर्मचा-यांना दिवाळी निमित्त महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने शिवाय प्रसारमाध्यमांकडून वारंवार त्याबाबतच्या बातम्या येत असल्या कारणाने यंदाची दिवाळी केंद्रीय कर्मचा-यांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी खास असणार हे वेगळे सांगायची गरज नाही.