7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगा च्या 'या' महत्त्वाच्या पदांसाठी भरती, upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरा अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता आणखी होतकरू तरुणांची पावलं सरकारी नोक-यांकडे वळली आहेत. त्यामुळे अशा नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांची महत्त्वाची बातमी! केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये ब वर्गातील वैज्ञानिकांसाठी (Scientist B) मध्ये विविध विभागांकरिता ही भरती निघाली आहे. या विभागातील एकून जागांसाठी ही भरती निघाली आहे. याकरिता 12 मार्च 2020 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती सातव्या वेतना आयोगाअंतर्गत करण्यात येणार असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना याचा खूप फायदा होणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातील या भरतीची सविस्तर माहिती करुन घेण्यासाठी तुम्ही WWW.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सातवे लागू झाल्यानंतर पेन्शनसह ग्रेच्युटीमध्येही होणार वाढ

पाहा कोणत्या पदांसाठी आहे ही भरती:

ज्युनिअर साइंटिफिक ऑफिसर-2

रिजनल होम इकॉनोमिस्ट-1

साइंटिस्ट बी (सिव्हिल इंजीनियर)- 7

साइंटिस्ट बी (सिव्हिल इंजीनियर)- 24

साइंटिस्ट बी (इलेक्ट्रीकल इंजीनियरिंग)- 2

साइंटिस्ट बी (मॅकेनिकल इंजीनियरिंग)- 2

साइंटिस्ट बी (एन्वायरमेंटल इंजीनियरींग) - 2

साइंटिस्ट बी (जियो फिजिक्स) - 1

कसा भराल अर्ज:

UPSC च्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन अर्ज दाखल करु शकता.

पात्रता:

पदांप्रमाणे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बघून त्याची निवड केली जाईल.

अर्ज भरण्याची तारीख:

23 फेब्रुवारीपासून ते 12 मार्च 2020 पर्यंत उमेदवार अर्ज भरू शकतात.

या भरतीसाठी जनरल/OBC उमेदवारांसाठी 25 रुपये अर्जाची रक्कम ठरविण्यात आली आहे. तर SC/ST आणि अपंगांकरिता विनामूल्य या भरतीकरिता अर्ज करता येतील.