7th Pay Commission: 18 महिने थकीत डीए अ‍ॅरिअर्सच्या प्रतिक्षेत असणार्‍या सरकारी कर्मचारी, पेंशनधारकांना लवकरच मिळू शकते आनंदाची बातमी
Money | Representational Image | (Photo Credits: PTI)

सातवं वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार मिळणार्‍यांसाठी सध्या त्यांच्या रखडलेल्या डीए (DA) चे वेध लागलेले आहेत. पण लवकरच सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेंशनधारकांना याबाबतची गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी, पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) 17% वरून 31% करण्यात आला आहे. दरम्यान 1 जानेवारी 2020 पासून 30 जून 2021 मध्ये रखडलेल्या डीए आणि डीआर ची रक्कम मात्र कर्मचार्‍यांना अद्याप मिळू शकलेली नाही. त्याची सध्या अनेकांना प्रतिक्षा आहे.

लेटेस्ट मीडीया रिपोर्ट्सनुसार डीए एरियर्स बाबत या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार कॅबिनेट केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना हा डीए एकरकमी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे काही कर्मचार्‍यांना त्यांच्या पे स्केल नुसार अंदाज हा थकीत डीए 2 लाखांपर्यंतही मिळू शकतो. नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा प्रतिक्षेत असलेला महागाई भत्ता जानेवारी महिन्याच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता - रिपोर्ट्स .

झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, नॅशनल काऊंसिल ऑफ जेसीएम शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लेव्हल 1 कर्मचार्‍यांना डीए 11,880 ते 37,554 रूपयांपर्यंत मिळू शकतो. तर लेव्हल 13,14 मध्ये हीच रक्कम 1,44,200 ते 2,18,200 रूपये इतकी पोहचू शकते.

यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार जेसीएम ची डीओपीटी आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा झाली आहे. या मुद्द्याला लवकरच कॅबिनेट सचिव समोर आणलं जाणार आहे. एका अधिकृत रिपोर्ट नुसार, सध्या 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 60 लाख पेंशनधारक आहेत.

केंद्रीय कर्मचार्‍यांना नियमानुसार, दरवर्षी वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ दिली जाते. जानेवारी 2022 चा देखील महागाई भत्ता किती वाढणार याची प्रतिक्षा कर्मचार्‍यांना आहे.