केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारक त्यांच्या प्रलंबित डीए आणि डीआर च्या हफ्त्यांची वाट पाहत आहे. दरम्यान आता या निर्णयाच्या घोषणेची वेळ जवळ येत आहे. काही मीडीया रिपोर्ट्सच्या आधारे केंद्रीय कर्मचार्यांना जुलै 2021 च्या डीए मध्ये 3% वाढ मिळण्याची शक्यता आहे. 14 जुलै म्हणजे उद्याच होणार्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये डीए,डीआर बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असे अंदाज आहेत. नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर! लवकरच मिळणार 'हा' लाभ.
एआईसीपीआई द्वारा जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यंदा सरकारी कर्मचार्यांना डीए मध्ये 3% पर्यंत कमाल वाढ मिळू शकते .सध्या केंद्रीय कर्मचारी आणि वेतनधारकांना 17% डीए मिळत आहे. दीड वर्षांपूर्वी भारतात दाखल झालेलं कोरोना संकट पाहता सरकारकडून कर्मचार्यांची डीए वाढ फ्रीज करण्यात आली आहे. त्यामुळे मागील 3 डीए वाढ अद्याप कर्मचार्यांना मिळू शकलेली नाही.
सातव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17% डीए मिळतो. मागील वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे जानेवारी 2020 (4%), जुलै 2020 (3%) आणि जानेवारी 2021 (4%) हे महागाई भत्त्यांचे हफ्ते फ्रिज करण्यात आले आहेत. त्यामुळेच डीए पुर्ववत झाल्यास आणि जुलै 2021 चा असा एकूण 31% (17+4+3+4+3) महागाई भत्ता होईल. रिपोर्टनुसार, क्लास 1 च्या कर्मचाऱ्यांचा डीए 11,880 रुपये ते 37,554 रुपयांपर्यंत असू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आरोग्य मंत्रालयासह प्रमुख मंत्रालयामधील मंत्री सहभागी होणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी 36 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आणि 7 जुन्या मंत्र्यांना पदोन्नती दिली आहे.