7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर! लवकरच मिळणार 'हा' लाभ
7th Pay Commission | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

7th CPC Update: केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक खुशखबर आहे. रिपोर्ट्सनुसार जुलै महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सद्वारे (All India Consumer Price Index) जानेवारी ते मे पर्यंत जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, जुलै मध्ये केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची संभावना आहे.

सातव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17% डीए मिळतो. मागील वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे जानेवारी 2020 (4%), जुलै 2020 (3%) आणि जानेवारी 2021 (4%) हे महागाई भत्त्यांचे हफ्ते फ्रिज करण्यात आले आहेत. त्यामुळेच डीए पुर्ववत झाल्यास आणि जुलै 2021 चा असा एकूण 31% (17+4+3+4+3) महागाई भत्ता होईल. (7th Pay Commission: केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांना आता SMS, WhatsApp द्वारा मिळू शकणार Monthly Pension Slip)

कामगार मंत्रालयाने मे 2021 च्या आयईसीपीआय (All India Consumer Price Index)चे आकडे जारी केले आहेत. यात मे 2021 च्या सूचकांकमध्ये 0.5 अंकांनी वृद्धी झाली आहे. त्यामुळे हे 120.6 वर पोहचले आहे. कामगार मंत्रालयाने अद्याप जूनचे आकडे जारी केलेले नाही. परंतु, जूनच्या आकड्यात मोठी वाढ झाली नसण्याची शक्यता अधिक आहे. 4% डीए वाढल्याने जूनमध्ये हा आकडा 130 पर्यंत जाईल. परंतु, आयईसीपीआयसाठी एका महिन्यात 10 पॉईंने वाढणे शक्य नाही. त्यामुळेच जुलैमध्ये महागाई भत्ता 3% हून अधिक वाढण्याची संभावना नाही आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीएची घोषणा सप्टेंबरमध्ये केली जाईल. यासाठी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, क्लास 1 च्या कर्मचाऱ्यांचा डीए 11,880 रुपये ते 37,554 रुपयांपर्यंत असू शकतो.