प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

7th Pay Commission:  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने 1 जुलै पासून 28 टक्के महागाई भत्ता देण्याची खुशखबर दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक मोठा झटका सुद्धा दिला आहे. सरकारने केंद्रीय कर्माऱ्यांची महिन्याभराची बेसिक सॅलरी (Basic Salary) वाढवण्यासंदर्भातील विचार करण्यासाठी नकार दिला आहे. म्हणजे आता स्पष्ट झाले आहे की, कर्मचाऱ्यांच्या मंथली बेसिक सॅलरीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही आहे.

28 जुलै रोजी राज्य सभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात असे म्हटले की, केंद्र सरकार अशा कोणत्याही योजनेवर विचार करत नाही आहे. त्यांनी असे ही म्हटले की, 2.57 चा फिटमेंट फॅक्टर सर्व कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांसाठी समान रुपात फक्त 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या सिफारशीच्या आधारावर रिवाइज्ड पे स्ट्रक्चर मध्ये वेतन निर्धारण उद्देशाने लागू करण्यात आला होता.(ATM Transaction Charges 1st August: एटीएम मधून पैसे काढताय? मग हे वाचाच, 1 ऑगस्टपासून बदलणार बरंच काही; 'पगार ते पेन्शन' जाणून घ्या 'हे' नवे नियम)

अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देत होते. यामध्येच एक प्रश्न विचारण्यात आला होता की, 7 व्या वेतन आयोगाच्या सिफारशीच्या आधारावर फिटमेंट फॅक्टरनुसार महागाई भत्ता आणि महागाई दिलासानंतर आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मंथील बेसिक पे वाढवण्यावर सक्रिय रुपाने विचारत करत आहे का?

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के DA दिला जात आहे. पण 1 जुलै 2021 पासून तो वाढून 28 टक्के केला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगारात हा महागाई भत्ता येणार आहे. जानेवारी 2020 मध्ये DA 4 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर जून 2020 मध्ये 3 टक्के आणि जानेवारी 2014 मध्ये 4 टक्क्यांनी वाढला होता. मात्र आता कर्मचाऱ्यांकडून जून 2021 च्या महागाई भत्त्याच्या डेटाची वाट पाहत आहेत. हा डेटा लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. AICPI च्या आकडेवारीनुसार 7th Pay Commission अंतर्गत जून 20201 मध्ये महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. असे झाल्यास एकूण DA वाढून 31 टक्के होणार आहे. 31 टक्क्यांची वाढीव रक्कम सप्टेंबरच्या पगारात येणार आहे.(ITR FY 2020-21 आयकर विभागाचं नवं पोर्टल incometax.gov वर 30 सप्टेंबरपूर्वी कसा फाईल कराल? इथे पहा स्टेप बाय स्टेप)

ऐवढेच नव्हे तर सरकारने महागाई भत्ता वाढवण्यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाउस रेंट अलाउंस मध्ये सुद्धा वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. नियानुसार HRA यासाठी वाढवण्यात आला आहे की, महागाई भत्ता 25 टक्क्यांहून अधिक झाला आङे. यासाठीच केंद्र सरकारने हाउसिंग रेंट अलाउंस सुद्धा वाढवून 27 टक्क्यांपर्यंत केला आहे. खरंतर डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरने 7 जुलै 2017 रोजी एक आदेश जाहीर केला होता. यामध्ये असे म्हटले होते की, जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के होईल तेव्हा HRA रिवाइज केले जाईल. 1 जुलै पासून DA सुद्धा वाढून 28 टक्के झाला आहे. त्यामुळेच HRA सुद्धा रिवाइज करणे गरजेचे आहे.