IVF Success Story: 54 वर्षांच्या संसारानंतर 70-75 वर्षाच्या वृद्ध जोडप्याच्या आयुष्यात IVF च्या माध्यमातून आलं बाळ
प्रतिकात्मक फोटो | Image for representation | (Photo credits: Pixabay)

संसाराच्या 54 वर्षांनंतर 75 वर्षीय पती आणि त्याची 70 वर्षीय पत्नी असलेल्या जोडप्याच्या आयुष्यात त्यांचं पहिलं बाळ आले आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan)  मधील अल्वर (Alwar) मधील असून त्यांचं बाळ आयव्हीएफ (IVF) च्या माध्यमातून आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही राज्यातील एकमेव घटना आहे. प्रगत तंत्रज्ञान आयव्हीएफ मुळे आता वयाच्या 70-80 वर्षी देखील जगभरात आपल्या बाळाचा आनंद घेता येत आहे.

अल्वर मधील जोडप्याला आयव्हीएफच्या माध्यमातून मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघांचीही स्थिती चांगली आहे. राजस्थान मधील या घटनेमुळे आता एक विशिष्ट टप्पा ओलांडलेल्यांच्याही आयुष्यात 'बाळ' येऊ शकतं ही आशा वाढली आहे. हे देखील नक्की वाचा: In Vitro Fertilisation: सत्तरीला दोनच वर्षे कमी असताना Margarett Adenuga नामक महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म.

बाळाचे वडील गोपिचंद हे माजी सैनिक आहेत. बांग्लादेश युद्धामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली होती. गोपिचंद यांनी आपणही वडील नैनू सिंग यांचे एकमेव अपत्य होतो आणि आता नवजात बालकामुळे माझा वंश पुढे चालत राहणार आहे याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दीड वर्षांपूर्वी एका नातेवाईकांच्या सल्ल्याने गोपिचंद फर्टिलिटी क्लिनिक मध्ये पोहचले होते. गोपिचंद यांची पत्नी चंद्रावतीदेवी या आयव्हीएफ च्या तिसर्‍या प्रयत्नामध्ये यशस्वीरित्या गर्भार राहू शकल्या. हा वैज्ञानिक दुनियेतील चमत्कार आनंददायक होता. सोमवारी या जोडप्याला मुलगा झाला आहे.

आयव्हीएफ मध्ये अंडाशयातील परिपक्व अंडी embryo तयार करण्यासाठी प्रयोगशाळेत शुक्राणूंसह शरीराबाहेर फलित केली जातात, जी नंतर वैद्यकीय मदतीने गर्भाशयात ठेवली जातात.

IVF हे test tube baby म्हणून देखील ओळखलं जातं. नैसर्गिकरित्या आई-बाबा होऊ न शकणार्‍यांना ही वैद्यकीय मदत मोठा आशेचा किरण आहे.