Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत (Baghpat) मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ती इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये शिकत होती. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिपोर्टनुसार, ती सकाळी 11 च्या सुमारास शाळेत खेळत होती. त्यादरम्यान छातीत दुखू लागल्याने ती तिथेच कोसळली. मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका अत्यंत दुर्मिळ आहे. परंतु हे काही विशिष्ट परिस्थितीत होऊ शकते. या कारणांमुळे मुलांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
प्राप्त माहितीनुसार, अपेक्षा ही फर्स्ट क्लासची विद्यार्थिनी होती. शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती इतर मुलांसोबत मैदानात खेळत असताना अचानक बेशुद्ध पडली. शाळा प्रशासनाने तत्काळ त्याच्या कुटुंबीयांना कळवले. अपेक्षाच्या पालकांनी तिला तीन वेगवेगळ्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टर तिचे प्राण वाचवू शकले नाहीत. (हेही वाचा -Rate of Heart Attack Increase On Mondays: सोमवारी हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! डॉक्टरांनी दिला इशारा; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या)
हृदयविकाराच्या झटक्याने सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू -
बागपतचे एसएचओ दीक्षित कुमार त्यागी यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण मानले जात आहे. हृदयविकाराच्या झटक्याने एवढ्या छोट्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा -Heart Attack: वीकेंडला जास्त झोपणे तुमच्यासाठी फायदेशीर, हृदयविकार होऊ शकतात दूर)
दरम्यान, अपेक्षाचे वडील संदीप कुमार बिजनौरमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. अपेक्षा बागपतच्या सुरुरपूर कलान गावात तिच्या आई आणि आजी-आजोबांसोबत राहत होती. शाळेतील एका शिक्षकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, अपेक्षा ही अतिशय सक्रिय आणि निरोगी होती. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अपेक्षाचे कुटुंबीय आणि शाळा व्यवस्थापनावर शोककळा पसरली आहे.