PIB चे प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल के एस धतवालिया यांना कोरोना विषाणूची लागण; 7 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Jun 07, 2020 11:42 PM IST
मुंबईतील कांजूरमार्ग (Kanjurmarg), घाटकोपर (Ghatkopar), विक्रोळी (Vikroli) , पवई (Powai) या परिसरातून गॅस गळती झाली असून या परिसरात त्याचा वास येत असल्याच्या काही तक्रारी शनिवारी रात्री नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मुंबई मनपाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र रात्रभराच्या तपासानंतर मुंबईत कुठेही गॅस गळती (Gas Leakage) झाली नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ज्या भागातून या तक्रारी आल्या तेथे अग्निशमन दलाच्या 17 यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार या परिसरांत तपास सुरु होता. मात्र येथे कुठेही वायुगळती न झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे भारतात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. सद्य घडीला देशात 1,15,942 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,14,073 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी 37 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.