पाण्याची पातळी पुन्हा वाढत असताना, चामोलीतील नदीकाठाजवळील लोकांना सतर्क करण्यात आले; 7 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Feb 07, 2021 11:36 PM IST
राजधानी दिल्लीत संजय कॉलनीत भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री 2 वाजता अग्निशमन दलाला आगीच्या घटनेबद्दल कळवण्यात आले असता त्यांनी तातडीने तेथे धाव घेतली. या भीषण आगीत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तसेच दिल्ली पोलीस आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत. घटनास्थळी 27 अग्निशमन दलाच्या गाड्या कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. तेथील विविध डेव्हलपमेंट कामांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील प्रमुख पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी करतील. या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आसाममध्ये 'असोम माला' कार्यक्रम सुरू करणार असून दोन रुग्णालयांची पायाभरणी करतील.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अभिनेत्री गहना वशिष्ट हिला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल कडून अटक करण्यात आली आहे. कारण गहना ही पॉर्न व्हिडिओत काम करण्यास त्याचे व्हिडिओ वेबसाइटवर पोस्ट करत होती. आज तिला कोर्टासमोर हजर केले जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.