मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस नेते कमलनाथ आणि इतर 8 जणांविरोधात FIR; 6 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Oct 06, 2020 11:42 PM IST
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील 4 दिवसांपासून कोविड19 चे उपचार सुरू असलेल्या Walter Reed Medical Center मधून त्यांना आता व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्यात आले आहे. अजूनही डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनामुक्त झालेले नाहीत मात्र सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असल्याने त्यांनी पुढील उपचार व्हाईट हाऊसमधून घेणं पसंत केले आहे. दरम्यान त्यांना व्हाईट हाऊसमध्येच रेमडिसिव्हिरचा 5चा डोस देण्यात येईल. त्यांच्या ऑक्सिजन पातळी उत्तम आहे. त्यामुळे पुढील काम ते घरातूनच करतील. अमेरिकेत दुसरं प्रेसिडेन्शिअल डिबेट 15 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. त्यामध्ये देखील ट्र्म्प सहभागी होतील.
भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात काल मागील 2 महिन्यातील निच्चांकी रूग्ण 24 तासांत समोर आले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात काल नव्या रूग्णांच्या आकड्यांमध्ये थोडी घसरण पहायला मिळाली आहे. दरम्यान एकीकडे मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुन्हा व्यवहार सुरू होत असताना दुसरीकडे रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
जम्मू कश्मीर मध्ये काल सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद 2 जवानांना आज श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे मृतदेह मूळगावी रवाना करण्यात आले आहेत. तर नौशेरा राजोरी सेक्टरमध्ये एका जवानाचा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवर झालेल्या गोळीबारात निधन झाले आहे.