तेलंगणामध्ये आज 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, तर 1831 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; 6 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jul 06, 2020 10:48 PM IST
मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे, रायगड,कोकण, तळकोकण येथे मागील तीन दिवसांपासुन सुरु झालेल्या पावसाने (Mumbai Monsoon) आज सकाळपासुन काहीशी विश्रांंती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज या भागात सलग पाउस होणार नाही पण मध्ये मध्ये जोरदार सरी मात्र बरसतील. आज, पश्चिम किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल मात्र वार्याचा वेग अधिक असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. कालच्या दिवसभरात मुंंबई सह ठाणे भागात सुद्धा 115.6 mm हुन अधिक पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे,महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येने 2 लाखाचा टप्पा पार केला असल्याने आता पुन्हा एकदा राज्य सरकारची चिंता वाढली आहे.आजवर, राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, आजपासुन उत्तरेकडील प्रांतात आजपासुन सावन (श्रावण) च्या महिन्याला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या सावन सोमवारी अनेक मंदिरात पुजा केली जात आहे, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा आज शिव मंंदिरात जाऊन पुजा केली.