Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची आणि बळींची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स सर्वोतोपरी उपचार करत आहेत. तर बहुतांश रुग्णांची प्रकृती सुद्धा सुधारली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनामुळे घाबरुन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान, आता बंगळूरु (Bengaluru)  येथे एका 50 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने हॉस्टिपटल्या 5 व्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता हॉस्पिटलच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक धोका हृदयविकाराचे आजार, अस्थमा सारखे गंभीर आजार, रोगप्रतिकारक शक्ती कमी आणि वयोवृद्धांना आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची काटेकोरपणे काळजी घेणे अत्यावश्यक आहेत. देशात कोरोनामुळे बळींचा आकडा वाढत चालला आहे. परंतु मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत आपली काळजी घेणे अत्यावश्यक असल्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहेत. देशात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. परंतु 3 मे नंतर लॉकडाउनसंदर्भातील निर्णय सरकार लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. (भारतात COVID-19 रुग्णांची एकूण संख्या 27,892 तर 872 कोरोना बाधितांचा मृत्यू)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. तर स्थलांतरित कामगार वर्गाला ही सरकारकडून मदत केली जात आहे. तर 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन- हॉटस्पॉट ठिकाणी जीवनावश्यक वस्तूसंदर्भातील दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र त्यावेळी सुद्धा नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.