केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; 5 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
May 06, 2020 12:32 AM IST
कोरोना.. कोरोना.. कोरोना..! सकाळी झोपेतून उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत कोविड 19 आणि कोरोना व्हायरस हे दोन्ही एकाच विषाणुची नावं आता परवलीचा शब्द झाली आहेत. प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि लोकचर्चा आदींमधून या शब्दाचा दिवसभरात उद्धार कधी, कुठे आणि किती वेळा याची गणतीच नाही. या विषाणूचा थेट मानवी आरोग्य आणि जीवन मरणाशी थेट संबंध येत असल्यामुळे असे घडताना दिसते. अद्याप तरी पृथ्वीवरील अखंड मानवजातीसमोर आव्हान बनलेल्या या विषाणूनर इलाज निघाला नाही. व्यक्तीव्यक्तीमधील प्रत्यक्ष संपर्कात काही फुटांचा दुरावा हाच सध्याच्या घडीचा काय तो उपाय. ज्याला सोशल डिस्टंन्सीग असा शब्द वापरला जातो आहे. हे सोशल डिस्टंन्सीग राखण्यासाठी जगभरातील देश लॉकडाऊन करुन बसले आहेत. लॉकडाऊन किती काळ चालणार, कसे हटवणार याबाबत सध्या तरी काही विशेष माहिती उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींमुळे कोरोना व्हायरस, कोविड 19 आणि लॉकडाऊन याबाबत घडणाऱ्या घडामोडी, घटना, वृत्त यांबाबतची अद्यवावत माहिती ठेवावे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच लेटेस्टली मराठीच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये ही माहिती अद्ययावतपणे दिली जाणार आहे.
दरम्यान, देश आणि राज्यभरात असलेल्या लॉकडाऊनदरम्यान काय स्थिती आहे. लॉकडाऊनला टाळेबंदी असाही शब्दप्रयोग केला जात आहे. कालपासून म्हणजेच 4 मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात लोकव्यवहार आणि इतर गोष्टींना काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. जसे की, दुकाने, उद्योग, व्यवसाय, मद्यविक्री दुकाने वैगेरे सुरु ठेवण्यात येणार आहेत. पण, असे असले तरी ही दुकाने सुरु करण्याबाबत मुभा देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनावरच अवलंबून असणार आहेत.
राज्य आणि देश यांसोबतच जगभरात काय चालले आहे याबाबतही जाणून घेणे महत्त्वाचे जसे की, इटली या देशाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. पण, आता इटलीलाही मागे टाकून अमेरिका हा कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला सद्यास्थितीचा सर्वात मोठा देश ठरला आहे. महासत्ता असलेल्या देशाची ही अवस्था म्हणजे नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट. त्यामुळे आता महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यात एक नवाच संघर्ष सुरु झाला आहे. अमेरिकेला वाटते की चीनच्या वुहान प्रांतातील प्रयोगशाळांमधून कोरोना व्हायरस निर्माण करण्यात आला. हा व्हायरस पूर्णपणे मानवनिर्मित आहे. अर्थात चीनने अमेरिकेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
कोरोनाच्या सर्व घटना, घडामोडी, लॉकडाऊन यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की मानवी आरोग्, ढासळती अर्थव्यवस्था, स्थलांतर, नागरिकीकरणाच्या समस्या असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व प्रश्नांकडे महाराष्ट्र, भारत आणि जग कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याबाबतची माहिती, घटना, घडामोडी आदींबाबतचे अद्ययावत तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.