कटकमधील कर्करोगाच्या रुग्णालयात 10 दिवसांमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण; 5 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jul 05, 2020 11:55 PM IST
राज्यात कोरना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्या वाढती आहे. त्यासोबतच आता पावसानेही जोर धरला आहे. काल दिवसभर आणि रात्रीही महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसोबत प्रामुख्याने मुंबई आणि कोकण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. आज दिवसभरातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काल पडलेल्या पावसात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले तर काही ठिकाणी पीकांची पडझड झाली. मुंबई शहरात सकल भागात पाणी साचले.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्रात निर्माण झालेली चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता रविवाही कमी होणार आहे. तरीही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील आणि देशातीलही कोरोना व्हायरस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अर्थात उपचारानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रामणही अधिक आहे. मात्र, असे असले तरी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी नाही. हिच मोठी चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मुंबईमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. असे असले तरी मुंबई पेक्षा ठाण्यामध्ये रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, मान्सूनचा पाऊस, कोरोना, भारत चीन तणाव, यांसर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक पातळीवरील विविध घटना घडामोडींबाबत लोकल ते ग्लोबल ताज्या घटना जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.