असम येथे आज आणखी 157 कोरोनाबाधितांची नोंद; 5 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Dec 05, 2020 11:38 PM IST
महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) कहर काही प्रमाणात कमी झाला असला तरीही कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. यात आळंदीत (Alandi) येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने 4-5 लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीत येत्या 6 डिसेंबरपासून संचारबंदी (Curfew) लागू होणार आहे. 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान ही संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सप्ताहाला 20 ते 50 वारक-यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी (Anvay Naik Suicide Case) आता रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आज अलिबाग सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर दुसरीकडे कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर काल नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे.