25 वर्षीय तरूणीसोबत लग्न केल्याने सोशल मीडीयात चर्चेत आलेले 45 वर्षीय Shankarappa यांची आत्महत्या
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

सोशल मीडीयामध्ये मागील काहीपूर्वी एका 45 वर्षीय व्यक्ती 25 वर्षीय तरूणीसोबत लग्न केल्याने चर्चेमध्ये आला होता. आता त्याने स्वतःचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळवार 29 मार्च दिवशी कर्नाटक मधील Tumakuru गावी त्याने आत्महत्या केली. त्याची गरोदर पत्नी हा धक्का पचवू शकलेली नाही. काल सारा दिवस ती अश्रू ढाळत होती.

45 वर्षीय Shankarappa यांनी 25 वर्षीय मेघना सोबत लग्न केले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर ते सोशल मीडीयामध्ये नेटकर्‍यांच्या निशाण्यावर आले आणि ट्रोल झाले होते.  नक्की वाचा:  IAS officer Tina Dabi दुसर्‍यांदा  लग्न करून होणार महाराष्ट्राची सून; जाणून भावी पती Pradeep Gawande कोण? 

शंकरप्पा यांचा मृतदेह झडाझुडपात आढळला आहे. पोलिसांना सुसाईड नोट देखील सापडली आहे. घरगुती वाद त्यांच्या आत्महत्येमागील कारण असू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे.

शंकरप्पा यांची आई आणि पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. आईने सूनेला शंकप्पाच्या मृत्यूला कारणीभूत धरत पोलिसांत तक्रार केली. शंकप्पाने आईला न विचारता लग्नाचा निर्णय घेतला. तर मेघनाने ती वेगळ्या जातीची असल्याने सासूकडून जाच होत असल्याचे वृत्त Bangalore Mirror ने दिले आहे. दरम्यान मेघनाने तिचे सासू सोबत सुरूवातीचे 3 महिने चांगले संबंध होते असे सांगितले आहे.