काल ठाण्यातून पोलिसांनी जप्त केला 9.57 लाखांचा 44.36 ग्रॅमचा गांजा ; 4 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Mar 04, 2021 11:40 PM IST
महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 1-10 मार्च दरम्यान सुरू असलेल्या या अधिवेशनामध्ये 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे पण विधिमंडळामध्ये विविध मुद्द्यांवरून चर्चा सुरू आहे. यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने जुपल्याचं पहायला मिळालं आहे. आज पुरवणी मागण्यांवरील चर्चांमुळे पुन्हा खडाजंगी रंगण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये कोरोना संकटाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. भारत सरकारने सीरम च्या आणि भारत बायोटेकच्या लसींना मंजुरी देण्यात आली आहे. आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सिने सादर केलेल्या अंतरिम अहवालामध्ये तो 81% असल्याचा दावा केला आहे. आयसीएमआर सोबत करण्यात आलेल्या देशाभरातील या चाचणी प्रक्रियेत 25,800 जणांनी सहभाग घेतला होता.
सुप्रिम कोर्टात आज आर्मी, नेव्ही मध्ये परमनंट कमिशन पदी महिला अधिकार्याची नेमणूक करण्याबाबतची सुनावणी होणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
केरळ मध्ये ईडी ने मनी लॉड्रिंग केस मध्ये माजी मंत्री आणि इंडियन युनियन मुस्लिम लिगचे आमदार VK Ebrahim Kunju नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना 22 मार्चला ईडी कार्यालयात सादर होताना उत्पन्नाविषयी काही माहिती देणं आवश्यक आहे.