आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे भाजपा नेत्या इमरती देवी यांच्यावर 1 दिवसाची बंदी; 31 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Oct 31, 2020 11:36 PM IST
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरात जवळपास 60 टक्के घट झाली आहे. परंतु, दिवाळी आणि थंडीच्या दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. देशभरात 80 लाखहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा अपघात झाला. या अपघातात क्रेनचे दोन भाग झाले आहेत. तसेच क्रेनचा एक भाग पडून बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनिल बैजल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं आहे.