भारतातील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अधिक गडद होऊ लागले आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांतही 15413 रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4,10,461 वर पोहचली आहे. त्यापैकी 169451 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 227756 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 13254 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) देण्यात आली आहे. (महाराष्ट्रात आढळले 3874 नवे कोरोनाचे रुग्ण, राज्यात कोरोना बाधितांची एखूण संख्या 1,28,205 वर)
देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. देशातील 4,10,461 पैकी तब्बल 124331 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्येही कोरोना बाधितांची आकडा मोठा आहे. तर मुंबई, दिल्ली या शहरांमध्येही कोरोनाचे संकट दाट आहे.
ANI Tweet:
306 deaths and highest single-day spike of 15413 new #COVID19 positive cases reported in India in last 24 hrs.
Positive cases in India cross 4 Lakh, stands at 4,10,461 including 169451 active cases, 227756 cured/discharged/migrated & 13254 deaths: Ministry of Health pic.twitter.com/s4xzVBykVF
— ANI (@ANI) June 21, 2020
देशातील कोरोना व्हायरसचे संकट परतवून लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. विविध उपाययोजना राबवून कोविड-19 रुग्णांची वाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नागरिकांना अनेक बाबतीत मुभा देण्यात आली असली तरी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.