Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात केलेल्या रुग्णांच्या संख्येत समाधानकारक वाढ होत असली तरीही कोरोना संक्रमितांची संख्या अजून आटोक्यात येत नाही आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात 3874 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1लाख 28 हजार 205 वर पोहोचली आहे. तसेच आज दिवसभरात राज्यात 160 रुग्ण दगावले असून मृतांचू एकूण संख्या 5984 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आज नवीन 1380 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 64153 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 58054 सक्रिय रुग्ण आहेत.

हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत आज 1197 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 65,265 वर

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून मुंबईत आज 136 मृत्यू आणि 1197 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण संक्रमितांची संख्या 65,265 झाली आहे. शहरात आतापर्यंत एकुणु 3,559 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 801 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आज शहरातून 610 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे व अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 32,867 रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेने माहिती दिली.