कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येबाबत आज महाराष्ट्राची राजधानी मुंबईने (Mumbai) 65 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत आज 136 मृत्यू आणि 1197 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण संक्रमितांची संख्या 65,265 झाली आहे. शहरात आतापर्यंत एकुणु 3,559 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 801 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आज शहरातून 610 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे व अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 32,867 रुग्ण बरे झाले आहेत. बीएमसीने याबाबत माहिती दिली.
धारावी (Dharavi) परिसरात आज 7 नवे कोविड-19 चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,158 वर पोहोचली आहे. यासोबतच धारावी परिसरात आतापर्यंत एकूण 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबई जिल्ह्याच्या रिकव्हरी रेट हा 50 टक्के आहे. 13 ते 19 जून या दरम्यान एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण हे 2.05 टक्के इतके होते. शहरात 19 जून पर्यंत एकूण 2,83,119 इतक्या कोरोना व्हायरस चाचण्या घडल्या आहेत व सध्या मुंबईचा डबलिंग रेट हा 34 दिवस इतका आहे.
एएनआय ट्वीट -
136 deaths and 1197 new #COVID19 positive cases reported in Mumbai today, taking the total number of positive cases to 65265. The death toll is at 3559: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/siiO80EeIc
— ANI (@ANI) June 20, 2020
यामध्ये काही दिलासादायक बाबी म्हणजे, मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (Glenmark Pharmaceuticals), फेवीपिरावीर (Favipiravir) अँटीव्हायरस टॅब्लेटला फॅबिफ्लू (FabiFlu) या ब्रँड नावाने बाजारात आणले आहे. सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी याचा वापर होणार आहे. भायखळा (Byculla) येथील Richardson&Cruddas या इंजिनीअरिंग कंपनीने आपले ऑफिस क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने या कंपनीत 1000 बेड्स सह क्वारंटाईन सेंटर उभारले आहे. या इमारतीत 1000 बेड्समध्ये 300 ICU बेड्स आहेत. ज्यात ऑक्सिजन पुरवठा आणि अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.