जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेत जवळ पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद; 3 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Feb 03, 2021 11:53 PM IST
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणार्या मुंबई महानगरपालिकेचं आज बजेट सादर होणार आहे. बीएमसी यंदा कोरोना संकटकाळात 25%चं उत्पन्न निर्माण करू शकली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरासाठी मुंबईकरांना कोणकोणत्या सोयी-सुविधा देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मुंबई कोस्टल रोड हा बीएमसीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. याच काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दीड वर्षांनंतर येणार्या पालिका निवडणूका पाहता आता कामांचा वेग वाढणार आहे. आरोग्य, रस्ते आणि पाणी या क्षेत्रात बीएमसी आजच्या बजेटमध्ये काय घोषणा करणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रशासन काम करत असतानाच नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी याने केलेल्या हिंदूंबद्दलच्या प्रक्षोभक विधानावरून आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. यामध्ये काल भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या पुण्यात एका भाजपा नेत्याने केलेल्या तक्रारीवरून शरजील विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान काल शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ पोहचल्यानंतर आज मुखपत्र असलेल्या सामनामधूनही त्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावण्यात आले आहे. तिरंग्याचा अपमान करून आंदोलन मोठे होत नाही. पण भाजपा सायबर सेल मुद्दामून तसे खोटे चित्र बनवत आहे. अशाप्रकारची कृती देखील तिरंग्याचा अपामान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.