Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: बेंगळुरूमधून (Bangalore) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कनकपुरा रोडवर एका अनोळखी व्यक्तीने सिगारेट (Cigarette) खरेदी करण्याची विनंती नाकारल्याने एका 29 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला कारने चिरडल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिगारेट खरेदी करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने पीडितेच्या मोटारसायकलचा पाठलाग केला आणि त्याला धडक दिली, ज्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, 10 मे रोजी सकाळी वसंतपुरा क्रॉसजवळ ही घटना घडली तेव्हा वज्रहल्ली येथील रहिवासी एचएन संजय हा त्याचा सहकारी चेतन (30) सोबत होता. सुब्रमण्यपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि चेतन एका स्थानिक दुकानाजवळ धूम्रपान करण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा प्रतीक नावाचा एक व्यक्ती एसयूव्हीमधून त्यांच्याकडे आला. प्रतीकने संजयला जवळच्या विक्रेत्याकडून सिगारेट आणण्यास सांगितले. जेव्हा संजयने सिगारेट आणण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की प्रतीकने घटनास्थळावरून निघून जाण्यापूर्वी संजयवर हल्ला केला. (हेही वाचा - Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून)

थोड्याच वेळात, संजय आणि चेतन त्यांच्या मोटारसायकलवरून घटनास्थळावरून निघून जात असताना, प्रतीकने त्याच्या एसयूव्हीमध्ये त्यांचा पाठलाग केला आणि जाणूनबुजून त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही स्वार दुचाकीवरून पडले. या अपघातात संजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झाला. तसेच जखमी झालेल्या चेतनवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोपीला अटक -

सुरुवातीला हत्येचा प्रयत्न म्हणून नोंदवलेला हा गुन्हा संजयच्या मृत्यूनंतर खुनात रूपांतरित झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना घटनांचा क्रम समजण्यास आणि संशयिताचा शोध घेण्यास मदत झाली. प्रतीकला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.