राजस्थान: 1 ते 31 डिसेंबर पर्यंत शहरी हद्दीत संध्याकाळी 8 ते सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू; 29 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Nov 29, 2020 11:46 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे भेट देत लसीच्या विकासासंदर्भात आढावा घेतला. तर पुण्यातील सीरम इंस्ट्यिट्युट ऑफ इंडिया येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. तेथे गेल्यावर मोदी यांनी लस निर्मितीच्या प्रक्रियेसंबंधित माहिती घेतली. त्यानंतर अदर पुनावाला यांनी असे म्हटले की, कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकांपर्यंत ही लस पोहचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच कोरोनावरील कोविशिल्ड ही लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात असल्याचे ही अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
तसेच देशभरातील शेतकरी फार्म बिलावरुन संतप्त झाले असून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करताना दिसून येत आहे. तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला जात असल्याचे ही आपण पाहिले. मात्र तरीही शेतकरी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर दिल्ली चलो आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत फार्म बिलाला तीव्र विरोध करणार आहेत. यासाठीच सीमेवर सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असे म्हटले की, शेतकऱ्यांशी बातचीत करण्यास तयार आहोत. तसेच सरकार त्यांच्या प्रत्येक मागणीवर विचार करण्यास ही तयार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 935110 वर पोहचला असून एकूण 136200 जणांचा बळी गेला आहे. तसेच 8759969 जणांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे.