पुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Mar 29, 2020 11:55 PM IST
कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करु लागले आहे. भारत देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 900 च्या पार गेली असून महाराष्ट्र राज्यातही 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटाचा धोका टाळण्यासाठी देश यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र तरी देखील रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' या रेडिओ प्रोग्रॅम मधून आज सकाळी 11 वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव विचारात घेता जीवनावश्यक वस्तू वगळता सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. या गंभीर संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही विविध उपाययोजना करत आहे. राज्यातील विविध ठिकाणी साफसफाई केली जात आहे. तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मेडिकल स्टोर्स, किराणा मालाची दुकाने 24 तास उघडी राहणार आहेत. विशेष म्हणजे बाहेर जाणे टाळावे याकरता किराणा माल ऑनलाईन ऑर्डर करण्याचे आवाहनही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
विशेष म्हणजे या संकटावर मात करण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी विविध स्तरातून लोक पुढे सरसावले आहेत. नेते मंडळी, आमदार-खासदार यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीज, क्रीडापटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांनी मदतीची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे सामाजिक भान जपत काही लोक स्वतःहून पुढे येत स्थलांतरीत कर्मचारी, गरजू यांच्यासह अगदी प्राण्यांची काळजी घेतनाही दिसत आहेत.