IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला; 28 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Sep 28, 2020 11:54 PM IST
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेती विधेयकास देशभरातील शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून विरोध होत आहेत. शेती विधेयकाचे समर्थन आणि विरोध असे दोन प्रवाह देशभरात पाहायला मिळत आहेत. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेले बिल हे कायद्यात परावर्तित होण्यासठी राष्ट्रपतींच्या स्वक्षरीसाठी गेले आणि अपेक्षेप्रमाणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वक्षरीही केली. या विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले. त्यामुळे आता या कायद्यास विरोध करणाऱ्या देशभरातील जवळपास 300 शेतकरी संघटना आपला विरोध मागे घेणार की कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे. संसदेत या विधेयकास काँग्रेस पक्षासह इतर 18 पक्षांनी विरोध केला होता.
दरम्यान, केंद्राने तयार केलेला कायदा महाराष्ट्रात लागू करायचा की नाही याबाबत महाविकासआघाडी सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकासआघाडीसरकारमधील घटक पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात या विषयावर एक बैठक काल पार पडली. या बैठकीत केंद्र निर्मित नवा शेती कायदा राज्यात लागू करायचा की नाही यावर खल झाला. हा कायदा राज्यात लागू करु नये असा आग्रह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरला. तर , शरद पवार यांनीही केंद्राच्या कायद्याला विरोध दर्शवला.
कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी आणि हे संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत. भारतातही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतू कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करुनही देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढते आहेच. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या प्रतिदिन सरासरी 18,000 ते 21,000 अशी राहताना दिसत आहे. त्यासोबतच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे असून बहुसंख्येने डिस्चार्जही दिला जात आहे. राज्यातील मृत्यूदर अधिक नसला तरी कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या पाहता तो आकडा लक्षणीय आहे.
कोरोना व्हायरस, आयपीएल 2020, राजकारण, अर्थकारण, समाज, संस्कृती, विज्ञान, क्रीडा यांसह शेती, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील ठळकड घडामोडींचे ताजे तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.