पुणे शहरात आज 1,213 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकूण संक्रमितांची संख्या 50,430 वर; 28 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jul 28, 2020 11:52 PM IST
कोरोना बाधितांचा आकडा देशात वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केंद्र सरकार सह सर्व राज्य सरकारं करत आहेत. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात येणारे अनेक सण साधेपणाने घरगुती स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन केले जात आहे. आज श्रावणातील दुसरा मंगळवार आहे. आजच्या दिवशी साजरी केली जाणारी मंगळागौर आता अनेक ठिकाणी व्हर्च्युअल माध्यमातून साजरी केली जाईल.
महाराष्ट्रातही कोरोना व्हायरस संकटामुळे उद्भवलेले अनेक प्रश्न सध्या मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम असून UGC च्या नियमांविरुद्ध युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या युजीसी उद्या आपली भूमिका मांडणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान राज्यात अद्याप 10 वीचा निकाल जाहीर झाला नसून विद्यार्थ्यांसह पालकवर्ग प्रतिक्षेत आहे. याच आठवड्यात SSC चा निकाल जाहीर होणार असून लवकरच निकालाबाबतची उत्सुकता संपेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये ऑनलाईन माध्यमातून FYJC ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येईल.