Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एकदा कोरोनाची लागण झाल्यावर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होता का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. परंतु, एका महिलेला पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बंगळुरु (Bengaluru) मधील 27 वर्षीय महिलेला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाची पुन्हा लागण होणारी ही बंगळुरु शहारातील पहिलीच रुग्ण आहे. जुलै महिन्यात या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, या महिन्यात तिला पुन्हा एकदा कोविड-19 (Covid-19) ची लक्षणे दिसून आली. त्यामुळे पुन्हा चाचणी करण्यात आली. तेव्हा त्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निश्चित झाले. अशी माहिती बंगळुरु मधील फोर्टिस हॉस्पिटमधून (Fortis Hospital) देण्यात आली आहे.

यापूर्वी देखील देशाच्या विविध भागात कोरोनाची पुन्हा बाधा झालेले रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. 25 ऑगस्ट रोजी तेलंगना मधील 2 लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. परंतु, ते दोघेही asymptomatic होते. (भारतात COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.32 टक्के तर मृत्यूदर 1.72 टक्क्यांवर पोहचला- केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

ANI Tweet:

4 सप्टेंबर रोजी मुंबईतील 4 डॉक्टरांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु, हे रिइंफेक्शन आहे की पूर्वीच्या इंफेक्शनचीच लक्षणं आहेत. हे निश्चित झाले नसल्याचे त्यापैकी दोन डॉक्टरांचे म्हणणे होते. अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली होती.