आसाममध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) दर्जाचे अधिकारी आणि अन्य 30 अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; 27 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jun 28, 2020 12:02 AM IST
आज सलग 21 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत वाढ झाली आहे. नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोलच्या किंमतीत 0.25 पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या किंमतीत 0.21 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर 80.38 रुपये प्रति लीटर असून डिझेलचे दर 80.40 रुपये इतके आहेत. दिल्ली प्रमाणेच मुंबई,लखनउ, कोलकाता,चेन्नई या शहरात सुद्धा इंंधनाचे दर वधारले आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे गाडी भाडे वाढल्याने दुसरीकडे भाज्या,फळे यांचे दर सुद्धा वाढलेले पाहायला मिळतायत. आजचे पेट्रोल-डिझेल चे वाढलेले दर शहरानुसार सविस्तर जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.
भारतात (India) काल (26 जून) दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 384 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. देशात काल 10,244 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 2,95,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे..
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सध्या पश्चिम बंगाल आणि झारखंड या दोन राज्यात लॉकडाउन 31 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाबत मात्र अशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.