पुणे येथे नॅशनल केमिकल लॅबॉरेट्रीमध्ये एका 30 वर्षीय संशोधकाची हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु; 27 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Feb 27, 2021 11:41 PM IST
दरवर्षी प्रमाणे यंदाही 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din 2021) म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती दिवशी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटद्वारे सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आपली भाषिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहूया. मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृद्ध करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
देशातील कोरोना लसीचा आढावा घेतला असता देशात आतापर्यंत 1 कोटी 34 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.