अयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीला करण्यास परवानगी नाकारली. दिवाळीच्या दिवशी व्हर्चुअल दीपोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू.

मध्य प्रदेशातील भोपाळ मुख्य स्टेशनवर उत्तर प्रदेशातील 22 वर्षीय महिलेवर दोन रेल्वे अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

 कोलकात नाईट राईडर्सने सनराइझर्स मात देऊन विजयाचे खाते उघडले आहे. कोलाकाने हैदराबादला 7 विकेट पराभूत करत 2 गुण प्राप्त केले आहेत.  

ड्रग्ज प्रकरणाचा निकाल लागण्याआधी प्रसारमाध्यमांनी कोणताही बातमी प्रसारित करू नये, यासाठी रकुल प्रीत सिंह याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

असाम पोलिस भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या संदर्भात आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे. पीटीआयचे ट्वीट- 

 

दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांवर अधिक दबाव आणण्याची वेळ आली आहे, असे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी आज अनंतनागमधील प्रशासन, सैन्य, पोलिस, सीएपीएफच्या अधिकाऱ्यांसमवेत काश्मीरमधील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत म्हणाले आहेत. ट्विट-

 

सांगली जिल्ह्यात आजअखेर 33447 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 23921 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 

गुजरातमध्ये आज 1,417 नवे कोरोना रुग्ण, तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रात आज 20,419 नवे कोरोना रुग्ण, तर 430 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 23,644 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13,21,176 इतकी झाली आहे. सध्या 2,69,119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गर्दी टाळण्यासाठी सोमवारपासून आणखी दोन महिला विशेष रेल्वे गाड्या धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

 

Load More

देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आता बिहार निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोगाने काल जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता बिहार येथील निवडणूकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जाणार असल्याचे दिसू लागले आहे. पण निवडणूक आयोगाने यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी किती गर्दी होईल किंवा कसे असेल निवडणूकीचे स्वरुप त्याच्या अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही नियम आणि अटी सुद्धा निवडणूकांसह मतदानावेळी घालण्यात येणार आहेत.

दुसऱ्या बाजूला  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 सप्टेंबर) संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75 व्या सत्राला संबोधित करणार आहेत. या महासभेला संबोधित करणारे पीएम मोदी पहिलेच वक्ता असणार आहेत. या करिता त्यांच्यासाठी आधीच वेळ ठरवण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 6.30 वाजता संबोधित करतील. तसेच शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सुद्धा UNGA मध्ये भाषण देणार आहेत. या सत्रात भारतासमोर दहशतावादासह अन्य काही महत्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थितीत केले जाऊ शकतात. मोदी दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याबद्दल जागतिक कारवाई करण्यासाठी समित्यांमधील संस्था व व्यक्तींची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेवर भर देऊ शकतात

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

या सर्व घडामोंडीमध्ये सर्वात मुख्य म्हणजे कोरोनाची आकडेवारी दिवसागणिक वाढत चालली आहे. तर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1300757 वर पोहचला असून 34761 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत सध्या 272775 रुग्णांवर उपचार सुरु असून एकूण 992806 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात सुद्धा काल गेल्या 24 तासात कोरोनाच्या 17,794 नव्या रुग्णांची नोद झाली. तर 416 जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात 19,592 जण बरे झाले. या सर्व आकडेवारीसर राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 13,00,757 इतकी झाली आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,72,775 रुग्णंसह डिस्चार्ज मिळालेल्या 9,92,806 आणि मृत्यू झालेल्या 34,761 जणांचा समावेश आहे.