Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री Michael Pompeo यांनी आपल्या भारत दौर्‍याच्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे शेअर केले ; 26 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Chanda Mandavkar | Oct 26, 2020 11:59 PM IST
A+
A-
26 Oct, 23:59 (IST)

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री Michael Pompeo यांनी आपल्या भारत दौर्‍याच्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे शेअर केले.

 

26 Oct, 23:29 (IST)

येत्या 3-4 तासांत नैऋत्य तमिळनाडू आणि लगतच्या दक्षिण केरळ, निकोबार बेटे, दक्षिण कोकण आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

26 Oct, 22:56 (IST)

अरुणाचल प्रदेशमध्ये आज 147 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

26 Oct, 22:56 (IST)

अरुणाचल प्रदेशमध्ये आज 147 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

26 Oct, 22:05 (IST)

यूपीमधून राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने 8 उमेदवारांची घोषणा केली. हरदीपसिंग पुरी आणि नीरज शेखर यांचा यादीत समावेश आहे. ट्विट-

 

26 Oct, 21:38 (IST)

सुप्रीम कॉर्टात मंगळवारी हाथरस प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

 

26 Oct, 20:58 (IST)

महाराष्ट्रात आज 3,645 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 84 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 9,905 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

26 Oct, 20:58 (IST)

महाराष्ट्रात आज 3,645 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 84 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 9,905 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

26 Oct, 20:26 (IST)

तामिळनाडूमध्ये आज 2,708 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

26 Oct, 20:15 (IST)

मध्य प्रदेशमध्ये आज 720 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,095 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Load More

देशभरासह राज्यात काल विजयादशमीचा सण साजरा करण्यात आला.  याच शुभमुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्याचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केले. मात्र त्यावेळी अगदी 50 जणांच्या उपस्थितीत  तो पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थिती लावली होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला दिल्लीतील हवेची स्थिती अधिक वाईट असल्याचे दिसून आले. या ठिकाणी प्रदुषण वाढल्याने वातावरण दुषित झाले आहे. तर एअर क्वालिटी इंडेक्स हा 307 पर्यंत पोहचला असून तो Very Poor कॅटेगरी मध्ये असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वत्र धुक्यांची चादर पसरल्याचे ही दिसून आले आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती आणि अशा पद्धतीचे वातावरण सध्याच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात बोलायचे झाल्यास रुग्णांचा आकडा 7864811 वर पोहचला आहे. तर देशात एकूण 668154 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून आतापर्यंत 7078123 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण 118534 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा 1638961 वर पोहचला आहे.


Show Full Article Share Now