मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून 14 पुस्तकांचे प्रकाशन ; 26 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Prashant Joshi
|
Feb 26, 2021 11:36 PM IST
देशात कोरोना विषाणू संक्रमण वाढत आहे. राज्य सरकारने पुन्हा एका अनेक निर्बंध घातले आहेत. एकीकडे देश या संकटाशी सामना करीत आहे तर दुसरीकडे गेले अडीच महिने चालू असलेले शेतकरी आंदोलन अजून तीव्र होत आहे. यात भर म्हणजे आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. भारत बंदमध्ये देशभरातून 8 कोटी व्यापारी सहभागी होणार आहेत. यासह ट्रान्सपोर्टर्स ऑर्गनायझेशननेही या दिवशी 'चक्का जाम' जाहीर केला आहे. यावेळी देशभरात सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत वाहतुकीची कोंडी होईल.
जीएसटी व्यवस्था सुलभ करण्याच्या उद्देशाने व्यापाराची सर्वोच्च संस्था, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे.
काल मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 1 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत काल 1145 रुग्ण आढळले असून 462 जणांचा आज डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच 5 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबईमधील कोरोना बाधितांमधील 80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेच नसल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे व त्यामुळे चिंता वाढल्या आहेत.