PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

25th National Youth Festival: थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे. प्रत्येक वर्षी 12 जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिवस' साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते तमिळनाडू आणि पुड्डुचेरी येथे व्हिडिओ कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्याचसोबत मोदी येथील कार्यक्रमाला सुद्धा संबोधित करणार आहेत.(National Youth Day 2022 Wishes: राष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा Greetings, WhatsApp Status द्वारा देत साजरी करा स्वामी विवेकानंदांची जयंती!)

नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता पुड्डुचेरीत व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमातून 25 व्या राष्ट्रीय युवा मोहत्सावाचा शुभारंभ करणार आहे. मोहत्सवाचा मुख्य उद्देष हे भारतातील तरुणांच्या मेंदूला चालना देणे आमि त्यांना राष्ट्राच्या निर्मितीसाठी एका संयुक्त शक्तीत बदलणे. कार्यक्रमाच्या दरम्यान, नरेंद्र मोदी 'माझ्या स्वप्नातील भारत' आणि भारतीय स्वतंत्रता आंदोलनातील अलिप्त थोरांवरील निबंधांचे अनावरण करणार आहेत. या दोन विषयांवरील निबंधांसाठी 1 लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला आहे. त्याचसोबत शिखर सम्मेलनच्या दरम्यान, तरुणांना पर्यावरण, हवामान बदल, SDGs च्या नेतृत्वाखाली शाश्वत विकास, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नाविन्य, स्वदेशी आणि प्राचीन ज्ञान, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्र उभारणी यासारख्या मुद्द्यांवर त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल.

त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण तमिळनाडूत 11 नवे शासकीय मेडिकल कॉलेज आणि चेन्नईत केंद्रीय शास्रीय तमिळ संस्थेच्या नव्या परिसराचे उद्घाटन करणार आहेत. नवे मेडिकल कॉलेजसाठी जवळजवळ 4 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये 2145 कोटी रुपये केंद्र सरकार आणि शिल्लक रक्कम ही तमिळनाडूच्या सरकारद्वारे दिली जाणार आहे.(Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा या प्रार्थनेसह वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीच वर साकारलं खास शिल्प)

देशातील सर्व ठिकाणी सर्वांच्या शिखाला परवडणारे असे वैद्यकिय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासह आरोग्याच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांच्या सततच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने ही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत - 'विद्यमान जिल्हा/रेफरल हॉस्पिटलशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना', एकूण 1450 जागांची क्षमता असलेली नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. या योजनेअंतर्गत, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, त्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातात.