भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश; 25 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Mar 25, 2020 11:26 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आजपासून पुढील 21 दिवस भारत देश लॉकडाऊन राहणार आहे. दरम्यान आज (25 मार्च) देशात चैत्र नवरात्र, गुढीपाडवा सारखा सण आहे. मात्र नागरिकांना यंदा घराबाहेर न पडण्याचं आवाहन केल्याने या सणाला यंदा अत्यंत साधं रूप आलं आहे. लोकांना घरातच बसून यंदा गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. आज सकाळपासून नागरिक घराबाहेर पडत नसल्याने जनता कर्फ्युप्रमाणेच आता पुढे 21 दिवस जनतेकडून साथ मिळणार असल्याचं सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. देशभर लॉकडाऊन असला तरीही यामधून अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय मदत वगळण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी.
महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब म्हणजे आता राज्यातील सुरूवातीचे काही कोरोनाबाधित आजारावर मात करून बाहेर पडत आहेत. सुमारे 48 जणांचा रूग्णालयातील कोरोनाविरोधी लढा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी आता नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळणं हा एकमेव पर्याय अवलंबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रामध्ये नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात काही मदत हवी असल्यास +91 2026127394 या व्हॉटस्अॅप चॅटबॉटवर प्रश्न विचारा असं आवाहन करत अनावश्यक गर्दी टाळण्याचं कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे.