शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही; वारीस पठाण विधानावरून देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका ; 25 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Feb 25, 2020 11:16 PM IST
सीएए, एनआरसी यांवरुन राजधानी दिल्लीमध्ये उसळलेला आगडोंब. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरु असतानाच ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी झालेला गोळीबार, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू. अनेकांचे जखमी होणे. यांमुळे सीएए, एनआरसी आणि दिल्ली चर्चेच्या आणि कायदासुव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आली आहे. दुसऱ्या बाजुला डोनाल्ड ट्रम्प हे भरत भेटीवर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दौऱ्यात काय घडामोडी घडतात. भारत अमेरिका यांच्यात काय करार होतात. उभय देशांतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी काय पावले टाकली जातात यांवरही आज दिवशभर लक्ष ठेवले जाणार आहे.
राज्य विधिमंडळाचे आणि पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सररकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झाले. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करुन राज्य सरकारने कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांच्या शिडातील हवा पहिल्याच दिवशी काढून घेतली. त्यामुळे आता अधिवेशनात आज नव्याने काय मुद्दे चर्चेला येतात याबाबत उत्सुकता आहे.
जगभरासाठी डोकेदुखी ठरलेला कोरोना व्हायरस आजही आपल्या संकटाची छाया जगावर कायम ठेऊन आहे. दररोज या कुठे ना कुठे नागरिकाना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे हे संकट पुढे आणखी किती गहिरे होणार हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबतही घडणाऱ्या घडामोडींवर लेटेस्टली लक्ष ठेऊन आहे.
दरम्यान, वरील विविध मुद्द्यांसह स्थानिक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच पातळींवर घडणाऱ्या घटना, घडामोडी आदींवर लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. त्यामुळे ठळक घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.