महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 23 जानेवारीला त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला. झेंड्यात बदल करण्यासोबत त्यांनी रणनिती सुद्धा बदलत पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा आक्रमक पावित्रा मनसेने घेतला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील बांगलादेशीच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून घुसखोरांच्या घरात घुसून त्यांना धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना अल्पसंख्यांच्या घरात घुसखोरी करत त्यांची छळवणूक केली असल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच त्यांना बांगलादेशी म्हणत त्यांना कार्यकर्त्यांना त्रास दिल्याने 22 फेब्रुवारीला त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. त्यानंतर 23 तारखेला सुद्धा असाच प्रकार घडल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.('दगडाला दगडाने तर तलवारीला तलवारीने यापुढे उत्तर देणार', आझाद मैदानातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा घुसखोरांना सज्जड दम)
Pune: FIR registered against MNS (Maharashtra Navnirman Sena) workers for allegedly 'trespassing in houses of minorities and harassing them, calling them Bangladeshis' on 22nd Feb. A complaint was filed in connection with the incident on February 23. #Maharashtra
— ANI (@ANI) February 24, 2020
तर 9 मार्चला मनसेचा मुंबईत बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी प्रथम जे देशात एनआरसी, सीएएच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच बांगलादेश येथून तब्बल दोन कोटी जण भारतात दाखल झाले असल्याने अशांना देशातून साफ करावे लागणार असल्याची त्यांची भुमिका स्पष्ट केली होती.