मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Photo Credits-ANI)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्या सारख्या घुसखोरांच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने विविध भागातून मनसैनिकांनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरे यांच्या मोर्चाला जवळपास 3 वाजता मरिन लाईन्स येथून सुरुवात होत आझाद मैदान येथे संपला. त्यानंतर राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी प्रथम जे देशात एनआरसी, सीएएच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच बांगलादेश येथून तब्बल दोन कोटी जण भारतात दाखल झाले असल्याने अशांना देशातून साफ करावे लागणार आहे. एवढेच नाही तर मुस्लिमांनी एनआरसी आणि सीएएच्या विरोधात काढलेल्या मोर्चाचा अर्थ काय होता हे अद्याप अस्पष्टच आहे.

राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दर्शवला असून 1955 मध्येच नागरिकत्व देण्याचा संदर्भात कायदा झाल्याचे भाषणातून स्पष्ट केले आहे.  तर पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम हे प्रामाणिक आहेत. मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाहीत असे ही विधान राज ठाकरे यांनी केले आहे. पण पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला असुन तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे राज्यातून घुसखोरांना हकलले पाहिजे असा पावित्रा राज ठाकरे यांनी भाषणातून दाखवून दिला आहे. राज्य सरकारला सांगून काही उपयोग नाही केंद्रालाच आता सांगावे लागणार असल्याचे ही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला प्रचंड गर्दी; मुंबई येथील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते दाखल)

Tweet:

तर राज्यात दंगल, बॉम्बस्फोट झाले की आपण हिंदू होतो. त्यामुळे आताच हिंदूनी जागे व्हा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने आता यापुढे उत्तर देण्यात येईल. आता फक्त मोर्चाने उत्तर देण्यात आल्याचा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे दर्शन झाल्याचे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.