पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) आज मोर्चा काढला आहे. या मोर्चाला मुंबई (Mumbai) येथील आझाद मैदानात (Azad Maidan) हजारो मनसे कार्यकर्त्यांसह समर्थकांनीही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ मुंबईहूनच नव्हेतर, राज्यातील अनेक शहरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाच्या मार्गावर मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मोर्चा मार्गावर स्थानिक पोलीसांच्या व्यतिरिक्त राज्य राखीव पोलिस दलाचे दंगा नियंत्रण पोलीस, क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोध आणि विल्हेवाट पथके आणि अतिरिक्त 600 पोलिस तैनात करण्यात आले होते, अशी माहिती इंडिया टूडेने दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच 23 जानेवारी रोजी पक्षाच्या झेंड्यासह आपल्या विचारधारेतही मोठा बदल केला आहे. तेव्हापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात आवाज उठवला सुरूवात केली आहे. तसेच येत्या 9 मार्च रोजी मनसेच्या मोर्चात सामील व्हा, असे आवाहन पक्षाकडून जनतेला करण्यात आले होते. नुकताच मनसेचा मोर्चा पार पडला असून या मोर्चात समर्थकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. मोर्चा निघण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. मनसेने भूमिका बदलल्याच्या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "मनसेने कधीही हिंदुत्व सोडले नाही. गेली तेरा वर्ष मनसेने हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. रझा अकादमीच्या विरोधात मनसेनेच आंदोलन केले होते," असे त्या म्हणाल्या होत्या. हे देखील वाचा-जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, तोपर्यंत दिल्लीवारी नाही- देवेंद्र फडणवीस
दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेच्या मोर्चावर आपली प्रतिक्रिया दिली आहेत. मनसेच्या मोर्चाने शिवसेनेवर कोणताही फरक पडणार नाही. आम्ही येथे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आलो आहोत. तसेच महाराष्ट्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे, असे शिवसेना आमदार दिलीप लांड म्हणाले आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय शिरसा यांनी शिवसेना ही सुरूवातीपासून हिदुत्वाच्या मुद्द्यावर लढत आली आहे आणि यापुढे लढणार, असे ते म्हणाले आहेत.
सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखातीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावेच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का? असा पश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, घुसखोरांना हाकला ही भुमिका बाळासाहेबांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी सर्वांसमोर मांडली होती. यामुळे आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम आहोत. तसेच कोणीही याचे श्रेय घेऊ नये, असे विधान करत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.