Gold | Representational Image | (Photo Credits: IANS)

Gold Price Update: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत सोने व्यापारावर होत आहे. आजच्या अपडेटनुसार सलग तिसर्‍या दिवशी सोन्याचे दर घटले आहे. अमेरिकन डॉलरमध्ये (Dollar) झालेल्या वाढी मुळे सोन्याचे दर 2 टक्क्यांनी कमी होऊन 1862 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत तर भारतात काहीच दिवसात सोने 50 हजाराच्या खाली येण्याची शक्यता आहे. आज मुंंबई (Mumbai Gold Rate) मध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 50 हजार 712 वर आला आहे. हेच दर मागील महिन्यात सर्वोच्च स्तरावर पोहचले होते, ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात तर सोने 56,000 रुपये प्रति तोळा विकले जात होते. Sovereign Gold Bond Scheme चा दुसरा टप्पा आजपासून सुरु; 'हे' आहेत ऑनलाईन सोने खरेदीचे दर

आजचे प्रमुख शहरातील सोन्याचे दर पाहिल्यास, मुंंबई मध्ये प्रती तोळा सोने 50,712 (24 कॅरेट) ने विकले जात आहे, तर राजधानी दिल्ली मध्ये मात्र अजुनही किंंमत 54 हजार 085 इतकी आहे. बंंगळुरु मध्ये आज 24 कॅरेट सोनं प्रति तोळा 53 हजार 468 ने विकलं जातं आहे आणि चेन्नई मध्ये 53,265, कोलकाता मध्ये 52 हजार 472, अहमदाबाद मध्ये 52 हजार 143 अशा सोन्याच्या किंंमती आहेत. यासंदर्भात goldpriceindia.com वर माहिती उपलब्ध आहे. Gold Mines In Jharkhand: कोरोनाच्या संकटात झारखंडमध्ये सापडली सोन्याची खाण

दरम्यान, चांदीचे दर देखील 1898 रुपये प्रति किलोने कमी होत 59,720 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर 61,618 रुपये प्रति किलोग्राम झाले होते. सोने चांंदी व्यापारात दर कमी होण्याचे मुख्य कारण हे कोरोना व्हायरसच्या काळात अर्थव्यवस्था आणि व्यापारावर झालेले परिणाम आहे. डॉलर मध्ये सुरक्षित गुंंतवणुक होत असल्याने सोन्यात गुंंतवणुक कमी होत आहे परिणामी सोन्याचे दर सुद्धा दिवसागणिक घटत आहेत.