
संपूर्ण देश कोरोना विषाणूविरोधात झुंज असताना झारखंड सरकार मालामाला झाले आहे. झांरखंडच्या (Jharkhand) पूर्व सिंहभूम (Singhbhum) जिल्ह्यातील भीतरडारी (Bhindari) खाणीत 250 किलो वजनाचा खजिना (Gold Mines) सापडला आहे. झारखंड सरकारने खाणीत सापडलेल्या सोन्याच्या लिलावाची तयारी सुरू केली असून या सापडलेल्या सोन्यामुळे झारखंड राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. रांची तमाडच्या दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी स्वर्णरेखा नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण चाळण्याचे कामही सुरु आहे, असेही भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहेत.
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे संचालक पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत काम सुरु आहे. दरम्यान, या सोन्यामध्ये वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचा समावेश असून 250 किलो सोने येण्याची अपेक्षा आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणनुसार; झारखंड हे देशातील सोने मिळणारे एक राज्य आहे. यापूर्वी देखील कुंडारकोचा, पहाडी आणि पारासी अशा अनेक ठिकाणी सोने आढळून आले होते. दरम्यान, राज्यात आणखी 7 ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसेच येत्या काही दिवसांत इतर खाणींचा शोध घेतला जाणार आहे. हे देखील वाचा- Lockdown: कोरोना व्हायरस प्रसार तर थांबल नाहीच, अर्थव्यवस्थाही घसरली, लॉकडाऊन काळात झाली चूक; राहुल गांधी यांच्या सोबतच्या चर्चेत Rajiv Bajaj यांचे वक्तव्य
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर झारखंड राज्याला मोठी लॉटरी लागली आहे. झारखंडमध्ये आतापर्यंत 781 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 321 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, एकूण 455 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.