धारावीत आज 33 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू; 23 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
May 23, 2020 11:50 PM IST
लाहोरहून कराचीला जाणारे पाकिरस्तान आंतरराष्ट्रीय विमान (PIA) कराची (Karachi) विमानतळाजवळील रहिवाशी भागात कोसळले. या भीषण अपघातात आतापर्यंत 97 जण ठार झाले असून दोघे बचावले. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या विमानात एकूण 99 प्रवासी आणि 8 कर्मचारी होते. जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वीच काही मिनिटे अगोदर विमानाचा संपर्क तुटला आणि ते कोसळले. विमानतळाजवळ मॉडेल कॉलनीतील जिना हौसिंग सोसायटी येथे ते कोसळले. हा भाग निवासी असल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे भारतात (India) कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून अमेरिकेत (America)तर मृतांचा आकडा 95,921 वर जाऊन पोहोचला आहे. ही स्थिती फार चिंताजनक असून गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1260 रुग्ण दगावल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,18, 447 वर पोहोचली असून महाराष्ट्रात रुग्णांची एकूण संख्या 44,582 वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली झाली असून 857 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.