पुण्यात आज 96 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 22 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Sep 23, 2020 12:02 AM IST
महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशामध्ये आता अभिनेत्री आशालता बावगावकर यांनी सातारामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या शूटिंगसाठी त्या सातारामध्ये होत्या. त्यावेळीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कालपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.
भिंवडीमध्ये काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बळींची संख्या आता 18 वर पोहचली आहे. काल या घटनेच्या दुर्घटनाग्रस्तांना 5 लाखांची रक्कम मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान एनडीआरएफ कडून मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना आता रिकव्हरी मध्ये म्हणजे कोरोनामुक्त होणार्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामध्ये सलग तिसर्या दिवशी 90 हजारांपेक्षा अधिक रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.