Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
12 minutes ago

महाराष्ट्र: माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महाडिकांसह दोघांसह गुन्हा दाखल ; 22 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Feb 22, 2021 11:50 PM IST
A+
A-
22 Feb, 23:49 (IST)

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचे 21 फेब्रुवारी रोजी पुण्यात लग्न झाले. या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महाडिक आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 Feb, 23:38 (IST)

जम्मू-काश्मीरच्या गांदरबल भागात अल्पवयीन बलात्कार पीडितेची गर्भधारणा संपुष्टात आणल्याप्रकरणी 6 जणांसह एका डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे.

22 Feb, 23:19 (IST)

झारखंड मध्ये मागील 24 तासांत 41 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,19,637 वर पोहोचली आहे.

22 Feb, 22:56 (IST)

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ट्वीट-

 

22 Feb, 22:29 (IST)

लॉकडाऊन टाळण्यासाठी सरकारला सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेकडे केले आहे. ट्वीट-

 

22 Feb, 22:10 (IST)

माझे निकटचे जेष्ठ स्नेही कोकण मतदार संघाचे माजी आमदार ,शिवसेना उपनेते, ठाणे शहराचे माजी महापौर,मा. अनंत तरे यांच्या निधनाची बातमी समजली. तरे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्वीट महाराष्ट्राचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ट्वीट-

 

22 Feb, 21:29 (IST)

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या धावपट्टीचे पुनर्बांधणीचे काम फेब्रुवारीच्या अखेरीस पूर्ण केले जाईल, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. ट्वीट-

 

22 Feb, 20:59 (IST)

महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधून गुजरातमध्ये येणाऱ्या लोकांची कोरोनाची तपासणी करण्यासाठी सीमांवर चेक पोस्ट सुरु करण्यात आले आहे. ट्वीट-

 

22 Feb, 20:26 (IST)

बुलढाणा, चिखली, खामगाव, मलकापूर आणि  देऊळगाव राजा भागात निर्बंध लादण्यात आले आहेत अशी माहिती बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली आहे.

22 Feb, 20:13 (IST)

मुंबईत मागील 24 तासांत 760 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,19,888 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Load More

भारतामध्ये मागील काही दिवस कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचं वाटत असतानाच आता मुंबई सह महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मात्र कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा कोविड 19 गाईडलाईनचं पालन करण्याचं आवाहन केले आहे. यामध्ये नागरिकांनी मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन केले आहे.

पुण्यामध्ये सध्या मिनी लॉकडाऊन आहे अकोला, अमरावती मध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

मुंबई मध्ये एकीकडे कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असताना आता इंधन दरवाढीचा मुद्दा देखील कळीचा झाला आहे. यावरूनच आज मुंबईतील वांद्रे परिसरात 'अच्छे दिन' वरून भाजपा ला टोमणा मारत युवासेनेने पोस्टरबाजी केली आहे. यामध्ये 2015 चे दर आणि आजचे दर जाहीर करण्यात आहेत.


Show Full Article Share Now