Live
केरळ: मुंबई येथून परतलेल्या 73 वर्षीय वृद्ध महिलेचा आज मृत्यू; 21 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
May 21, 2020 11:28 PM IST
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ धडकलं असून या वादळाने पश्चिम बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यामुळे ओढावलेली गंभीर परिस्थिती National Disaster Response Force (NDRF) ची टीम हाताळत आहे. नुकसान झालेल्या भागात परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज हे चक्रीवादळ ताशी 30 km च्या वेगाने उत्तर-ईशान्येकडे सरकले. त्यानंतर तेथे त्याचा वेग मंदावण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती कायम असली तरी लॉकडाऊन 4 ची नवी नियमावली दिलासादायक आहे. देशात कोरोना बाधितांनी 1 लाखाचा टप्पा पार केला असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही आशादायी आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. तसंच मुंबई शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशात स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजूरांना घरी पोहचवण्याचे काम सध्या सुरुच आहे. दरम्यान अमेरिकेत कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे तब्बल 1,561 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.