मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. मुंबईत आज 1 हजार 242 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 41 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 66 हजार 507 वर पोहचला आहे. ट्विट- 

 

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 3 हजार 870 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 101 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 65 हजार 744 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

हरियाणाच्या दिग्गज डावखुरा फिरकीपटू राजिंदर गोयल यांचे दिर्घ आजारामुळे रविवारी निधन झाले आहे. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे. ट्विट- 

  

गुजरातमध्ये आज 580 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे.  अशाप्रकारे एकूण संक्रमितांची संख्या 27,317 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण मृत्यूंची संख्या 1,664 झाली आहे.

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज एका दिवसात शहरात 108 रुग्ण आढळले आहे. आज शहरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बधितांची एकूण संख्या 1201 झाली असून, आतापर्यंत कोरोनामुळे 63 जणांचा मृत्यू झाला आहे. 

तामिळनाडूमध्ये आज एका दिवसातील सर्वाधिक, 2,532 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 59,377 झाली आहे. सध्या राज्यात 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत 14 इंडो-तिबेट सीमा पोलिसांना (ITBP) कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या एकूण 58 सक्रिय प्रकरणे आहेत आणि 210 पोलीस बरे झाले आहेत.

प्रादेशिक भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मिझोरम, मेघालय, मणिपूर येथे 5.1 रिश्टर स्केलसह मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. Aizawl जवळ भूकंपाचे केंद्र होते.

 

मुंबईच्या धारावी भागात आज 12 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण आढळून आले असून, इथल्या एकूण रुग्णांची संख्या 2170 झाली आहे व मृतांचा आकडा 80 झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली.

रथयात्रा थांबवण्यासाठी कोणीतरी हा एक सुनियोजित प्लॅन आखला आहे, अशा आरोप पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथयात्रेला यंदा स्थगिती देण्यात आली होती.

Load More

आज 21 जून जागतिक योगदिन. योगदिन सर्व जगभरात दरवर्षी अगदी उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदाचा योगदिन 'घरी योगा आणि कुटूंबासह योगा' (Yoga at Home & Yoga With Family) या थीमवर साजरा होणार आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिनानिमित्त देशवासियांना संबोधित केले. दरम्यान आज सूर्यग्रहण देखील आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9.16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10.19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. दुपारी 3.04 मिनिटांनी संपेल.

दरम्यान भारतात कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या 395048 झाली असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. तर देशात एकूण 12948 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी सुविधांनी सज्ज क्वारंटाईन सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. पावसाळा आणि कोविड-19 चे संकट यामुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ नये यामुळे BMC कडून महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत.