डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी गुजरात येथे मिनी मोटेरा स्टेडिअमची उभारणी; 21 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Feb 21, 2020 11:50 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (21 फेब्रुवारी 2020) दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Congress) या तिन पक्षांचे मिळून महाविकाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार का याबाबत उत्सुकता आहे. मागे एकदा आपण मोठे भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार का असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला होता. त्यावेळी मी पंतप्रधान मोदी यांना भेटेनच परंतू, भाजप लालकृष्ण अडवाणी यांनाही भेटणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दुसऱ्या बाजुला महाविकासआघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय जोरदार चर्चेत आहेत. यात शालेय परिक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरुन 'नापास' शेरा हटवून त्या ठिकाणी फेरपरीक्षेसाठी पात्र असा शेरा लिहिण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचेही संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे या निर्णय आणि संकेतांवर आज दिवसभरात काय प्रतिक्रिया उमटते याबाबतही उत्सुकता आहे.
दुसऱ्या बाजूला, अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्र सरकार विशष तयारी करत आहे. गुजरातमध्ये काही कार्यक्रमात ट्रम्प सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्यावर काहींनी जोरदार टीका सुरु केली आहे. भारतासोबत या दौऱ्यात विशेष डील होणार नाही. झाल्याच तर, त्या किरकोळ स्वरुपाच्या असतील अशा आशयाचे ट्विट ट्रम्प यांनी आगोदरच केले आहे. त्यामुळे जर मोठे डिल होणार नसेल तर, ते या दौऱ्यावर का येत आहे? असा सवाल या दौऱ्याचे टीकाकार विचारत आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरस जगभरातील देशांची डोकेदुखी ठरला आहे. त्याबाबतच्या घटना घडामोडींवरही आज दिवसभरात लक्ष राहणार आहे. याशिवाय स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय बातम्यांबाबतही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. दिवसभरातील ठळक घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.