किशोरवयातील प्रेमाची गंमतच वेगळी असते. हैदराबाद मध्ये असाच 20 वर्षीय मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला. प्रेम बहरतच असताना त्याचा करूण अंत झाला आहे. हा तरूण बेकरी मध्ये काम होता. प्रेयसीला सार्यांपासून लपून भेटायला गेला असता 4 मजली इमारतीच्या टेरेसवरून कोसळून त्याचा अंत झाला आहे. ही घटना हैदराबाद मधील Borabanda भागातील आहे.
प्रेयसीला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली होती. तिची ही इच्छा पूर्ण करायला रात्री तो तिच्याकडे गेला. कुटुंबापासून लपून छपून त्यांची प्रेम कहाणी बहरत असल्याने त्यांनी टेरेसवर भेटण्याचा प्लॅन केला. त्यांची भेट देखील झाली पण कुणीतरी येत असल्याची त्यांना चाहुल लागली. ही व्यक्ती प्रेयसीचे वडील असतील या भीतीने त्यांची घाबरगुंडी उडाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियकर Mohammed Shoaib एका आडोशाला लपला. त्याने जवळच असलेली एक कॅबल पकडली होती. पण त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. चौथ्या मजल्यावरून पडलेल्या शोएबचा मृत्यू झाला आणि या लव्हस्टोरीचा करूण अंत झाला. दरम्यान शोएब आणि त्याच्या गर्लफ्रेंडची नुकतीच ओळख झाली होती. Mumbai Shocker: वसई मध्ये 17 वर्षीय मुलाची 3 मजली इमारतीच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या; तपास सुरू .
शोएब सोबत घडलेल्या या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. ते पहाटे 3 वाजता घटनास्थळी पोहोचले आणि शोएबला उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये हलवले. उपचार सुरू असतानाच पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शोएबचे वडील शौकत अली यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.