दिल्ली (Delhi) तील विकासपुरी (Vikaspuri) परिसरात घडलेल्या एका घटनेत, प्रियकर लग्नाला तयार होत नसल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणीने त्याच्यावर चक्क ऍसिड हल्ला (Acid Attack) केल्याचे समोर येतंय. संबंधित जोडपं बाईक वरून जात असताना तरुणाच्या मागे बसलेल्या प्रेयसीने त्याच्यावर ऍसिड फेकले. पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर ऍसिडच्या दाहाने जखमी झालेल्या तरुणाने आरडाओरडा करायला सुरवात केली आणि आजूबाजूचे लोक गोळा झाले . यावेळी स्वतः अडकू नये म्हणून या डोकेबाज प्रेयसीने बाजूने जाणाऱ्या वाहनावरून कोणीतरी हा हल्ला केल्याचा कांगावा केला.मात्र वास्तवात या मुलीच्या हातावर ऍसिडचे काही थेंबच उडाले होते तर प्रियकर मात्र गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी तरुणी व तिच्या प्रियकराची स्वतंत्र रित्या अनेक दिवस चौकशी केली मात्र तरीही त्यांना हल्ला करणाऱ्याचा नेमका अंदाज लागत नव्हता. चौकशी दरम्यान प्रियकराने सांगितल्याप्रमाणे, बाईकवर फिरताना ही मुलगी तरुणाला हेल्मेट काढायला सांगत होती, शेवटी तिचे ऐकून त्याने हेल्मेट काढले आणि लगेचच हा प्रकार घडला. या जबाबामुळे पोलिसांसाच्या संशयाची सुई ही तरुणीवरच येऊन थांबत होती. पुणे: दारुला पैसे न दिल्याने तरुणाची दगडाने ठेचून हत्या
अखेरीस आता तरुणीने आपला गुन्हा मान्य केल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. तरुणीच्या माहितीप्रमाणे मागील दोन तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते मात्र हा तरुण लग्नासाठी काही केल्या तयार होत नव्हता. यामुळे चिडलेल्या तरुणीचा राग अनावर होऊन तिने एक दिवस जाऊन चक्क ऍसिड ची बॉटल विकत घेतली आणि हा प्लॅन आखला. जर का आपला प्रियकर आपला होत नाही, तर त्याला कोणाचाच होऊ द्यायचे नाही असा फिल्मी विचार करत तिने या गुन्हयाचे प्लॅनिंग केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणीला अटक केली असून मुलाचा चेहरा व छाती ऍसिडच्या हल्ल्याने भाजून निघाली आहे.